पुणे | महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला. मंडळाच्या सचिव अनुराधा ओक, माणिक बांगर आदी या वेळी उपस्थित होते. यावर्षी 21 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधीत बारावीची परीक्षा घेण्यात आली. 3 हजार 195 मुख्य केंद्रांवर झालेल्या या परीक्षेसाठी 14 लाख 57 हजार 283 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. गेल्या पाच वर्षांतील सर्वोच्च विद्यार्थी नोंदणी यंदा झाली होती. सीबीएसई, आयसीएसईचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्य मंडळाच्या निकालाकडे विद्यार्थी पालकांचे लक्ष लागले होते.
या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम या शाखांतील एकूण 1428194 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
1 लाख 31 हजार 561 विद्यार्थ्यांना 75 टक्क्यांहून अधिक गुण
1 लाख 76 हजार 763 विद्यार्थ्यांना 35 टक्के ते 45 टक्के गुण
विभागीय मंडळनिहाय निकाल
पुणे : 93.34 टक्के
नागपूर – 90.35 टक्के
औरंगाबाद – 91.85 टक्के
मुंबई – 88.13 टक्के
कोल्हापूर – 93.28 टक्के
अमरावती – 92.45 टक्के
नाशिक – 91.66 टक्के
लातूर – 90.37 टक्के
कोकण – 96.1 टक्के
शाखानिहाय निकाल
कला – 84.05 टक्के
विज्ञान – 96.9 टक्के
वाणिज्य – 90.42 टक्के
व्यवसाय अभ्यासक्रम – 91.25 टक्के