अमेरिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांचा दुर्मिळ पुतळा चोरीला; पुण्याशी होते खास कनेक्शन

Chhatrapati Shivaji Maharaj Statue In America : शिवजयंतीच्या अगदीच काही दिवस आधी शिवप्रेमींसाठी एक मोठी धक्कादायक बातमी समोर येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा कॅलिफोर्नियातील एकमेव असा दुर्मिळ पुतळा चोरीला गेल्याची घटना घडली आहे. उत्तर अमेरिकेतील सॅन जोस उद्यानातून महाराजांचा पुतळा चोरीला गेला आहे. हा पुतळा चक्क कापून चोरी करण्यात आला आहे.

सॅन जोस पार्क विभागाने यासंबंधी ट्वीट करून माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहलं आहे की, ‘ग्वाडालुपे रिव्हर पार्कमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा गायब झाला आहे. हे कळवताना आम्हाला अत्यंत दु:ख होत आहे. मात्र, हा पुतळा कधी चोरीला गेला? याबद्दल अद्याप माहिती स्पष्ट झालेली नाही.’

छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा पुण्यातून अमेरिकेला भेट म्हणून देण्यात आला होता. उत्तर अमेरिकेतील मराठा शासकाचा हा एकमेव पुतळा होता. या घटनेनंतर संपूर्ण शहरामध्ये नाराजी पसरली असून शिवप्रेमींनी दु:ख व्यक्त केलं आहे. दरम्यान, आम्ही पुतळ्याचा शोध घेत असून शक्य तितक्या लवकर पुतळा शोधू अशी माहिती विभागाकडून देण्यात आली आहे. या घटनेची चौकशी सुरू असून पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.

Dnyaneshwar: