विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न करा

विद्यार्थ्यांचे उज्ज्वल यश
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये इंदापूर येथील राधिका माध्यमिक विद्यालयाचा १०० टक्के निकाल लागला आहे. यामध्ये प्रथम भाग्यश्री मच्छिंद्र गव्हाणे ८७ टक्के, द्वितीय आकाश संतोष नरुटे ८५.४० टक्के, तृतीय सृष्टी गणेश टुले ८४.८० टक्के, चतुर्थ क्रमांक दीक्षा बालाजी सरक ८४.२० टक्के व पायल अंकुश पवार ८३.२० टक्के यांना मिळाला असून, संस्थेचे अध्यक्ष अरविंद वाघ, नगरसेवक अनिकेत वाघ, शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय दडस यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

इंदापूर : इंदापूर शहरातील राधिका माध्यमिक विद्यालयात ५ वी ते १० वीपर्यंतचे उत्तम दर्जाचे शिक्षण दिले जाते. विद्यालयात शिक्षण घेणारे विद्यार्थी प्रामुख्याने ग्रामीण भागातून येत असतात. अभ्यासाव्यतिरिक्त इतरही कार्यक्रमांची अंमलबजावणी उत्तम पद्धतीने झाली पाहिजे. तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे, असे प्रतिपादन राधिका सेवा संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष अरविंद (तात्या) वाघ यांनी केले. इंदापूर शहरातील राधिका माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके व गुलाबपुष्प देऊन संस्थेचे अध्यक्ष अरविंद वाघ यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

यावेळी नगरसेवक अनिकेत वाघ, मुख्याध्यापक दत्तात्रय दडस यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन सत्कार केला, तर महाराष्ट्र शासनाच्या पाठ्यपुस्तक उपक्रमांतर्गत ५ वी ते ८ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके वाटप करण्यात आली. यावेळी पाचवीच्या वर्गात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुस्तके देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी मुख्यध्यापक दत्तात्रय दडस, क्रीडाशिक्षक तथा राष्ट्रीय कुस्ती पंच शरद झोळ, शिक्षक विनय थोरात, नानासाहेब देवकर, शिक्षिका सुनीता गलांडे, पालक अशोक कोकाटे, धनाजी कोकाटे, महावीर मखरे, मोहिनी शिंदे – भोसले आदी उपस्थित होते.

Nilam: