विद्यार्थ्यांना परीक्षेत १५ मिनिटे वेळ वाढवून; कुलगुरूंच्या बैठकीत निर्णय

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन झाल्या आहेत. ऑनलाईन परीक्षांमुळे विद्यार्थ्यांचा लिहिण्याचा सराव खूपच कमी झाला आहे. आणि पुढील परीक्षा ऑफलाईन होणार असल्याने विद्यार्थ्यांना लिखाणासाठी वेळ लागू शकतो. ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेताना वेळ वाढवून देण्याची मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून करण्यात येत होती. ऑफलाईन परीक्षांसाठी प्रती तास 15 मिनिटे वाढीव वेळ देण्याचा निर्णय कुलगुरूंच्या बैठकीत घेण्यात आला.

२०२० च्या मार्च एप्रिल मध्ये होणाऱ्या वार्षिक परीक्षा कॉरोना आणि लोकडाऊनमुळे लांबल्या होत्या. शेवटी त्या २०२० च्या शेवटी ऑनलाईन घेण्यात आल्या. त्यामुळे सर्वांचेच शैक्षणिक वर्ष पुढे सरकलेले आहे. तेव्हापासून या वर्षी २०२२ मध्ये देखील मार्च आणि एप्रिल महिन्यात झालेल्या सत्र परीक्षा ऑनलाइनच होत आल्या आहेत. ऑनलाईन वर्गांमुळे ऑनलाईनच परीक्षा व्हायला हव्यात अशी मागणी आजवर विद्यार्थ्यांकडून करण्यात आली होती. मात्र यापूढील सगळे वर्ग ऑफलाईन होतील आणि परीक्षा देखील ऑफलाईनच होतील असे आदेश यूजीसीने दिले आहेत.

मात्र लेखी परीक्षेचा सराव नसल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षेत वेळ वाढवून मिळण्याबाबत मागणी केली होती ती मागणी आज कुलगुरूंच्या बैठकीत पूर्ण झाली आहे. विद्यार्थ्यांना १५ मिनिटे जास्त वेळ परीक्षेसाठी देण्यात आला आहे.

Dnyaneshwar: