मुंबई – Subhash Sabne on Balasaheb Thackeray | राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. शिवसेनेमधून बाहेर पडलेल्या शिंदे गटातील आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढत असल्याचं कोर्टामध्ये दाखल केलेल्या याचिकेमध्ये म्हटलं आहे. अशातच आता शिंदे यांनी सुभाष साबणे यांचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे.
या व्हिडीओच्या माध्यमातून छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही धारेवर धरलं आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक करणाऱ्या छगन भुजबळ यांच्यासोबत मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळात बसताना आपल्याला काहीच यातना होत नाहीत का?, असा सवाल सुभाष साबणे करत आहेत.
दरम्यान, एकनाथ शिंदे माझं दैवत आहे म्हणूनच त्यांच्या बंडाला पाठिंबा दिला. शिवसैनिकांनी एकनाथ शिंदेंच्या पाठिशी खंबीरपणे उभं राहावं तरच शिवसेना आणि महाराष्ट्र टिकेल, असं साबणे म्हणाले.