मुंबई | गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटसृष्टीने कात टाकली आहे. त्याच त्याच विषयांवर साचेबद्ध चित्रपट न बनवता निर्माते व दिग्दर्शक अनेक उत्कृष्ट विषय हाताळत आहेत. काही पारंपरिक तर काही बोल्ड विषयांवरचेही चित्रपट गेल्या काही वर्षांत आपण बघितले. मराठी चित्रपटसृष्टी आता अधिक प्रयोगशील झाली आहे व नव्या पिढीच्या मराठी प्रेक्षकांनीही या वेगळ्या विषयांवरच्या मराठी चित्रपटांना अगदी मनापासून दाद दिली आहे. त्यापैकीच एक असलेले कॉटनकिंग नेहमीच दर्जेदार शॉर्ट फिल्मद्वारे संवेदनशील विषय मांडत आले आहे. आता मराठी चित्रपटविश्वातून एक गोड बातमी समोर आली आहे. ती म्हणजे अभिनेता सुबोध भावे आता ‘मी, मोगॅम्बो आणि कांदेपोहे’ या शॉर्टफिल्ममध्ये दिसणार आहेत.
अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री मधुरा वेलणकर आता ‘मी, मोगॅम्बो आणि कांदेपोहे’ या शॉर्टफिल्ममध्ये दिसणार आहेत. कॉटनकिंगचे संचालक कौशिक मराठे यांची प्रस्तुती असलेल्या आणि अद्भुत प्रॉडक्शन्सच्या मोनिका धारणकर व वैभव पंडित यांची निर्मिती असलेली ही शॉर्टफिल्म 12 मे रोजी सोशल मीडियाद्वारे प्रदर्शित होणार आहे. नुकताच या शॉर्टफिल्मचा जबरदस्त टीझर आणि पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला. या शॉर्टफिल्म मध्ये अनिरुद्ध देवधर आणि गंगुबाई फेम सलोनी दैनी हे पण प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. सहज लिखाणासाठी ओळख असलेल्या मोनिका धारणकर यांनी या फिल्मचे लेखन केके आहे आणि ऍड-फिल्म मेकर वैभव पंडीत यांचं दिग्दर्शन आहे.