सोलापूर : (Subramnyam Swami On Devendra Fadnavis) पंढरपूरचं कॉरिडोअरचा वाद चांगलाच चिगळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावरून राज्य सरकार आणि भाजपच्या बड्या नेत्यांमध्ये जुंपली आहे. या संबधी भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी चॅलेंज दिलं आहे. ते म्हणाले, “देवेंद्र फडणवीसजी, जास्त बोलाल तर तुम्ही उपमुख्यमंत्रीही राहणार नाहीत,” अशा शब्दात फडणवीस यांना इशाराही देण्यात आला आहे.
पंढरपूरमधील विकास आराखड्याला स्थानिकांनी विरोध केलाय. यासंबधी स्थानिक नागरिकांनी मुंबईत माझी भेट घेऊन या विषयात हस्तक्षेप करण्याची विनंती केली अशी माहिती सुब्रमण्यम स्वामी यांनी दिली आहे. भाजपचे नेते असतानाही पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबद्दल बेधडक बोलणाऱ्या स्वामी यांनी पंढरपुरात येऊन फडणवीस यांना इशारा दिला आहे. त्यामुळे येत्या काळात भाजपच्या दोन नेत्यांमध्ये जंपण्याची शक्यता आहे.
काहीही झालं तरी पंढरपूरचं कॉरिडोअर होणार, अशी भूमिका फडणवीस यांनी घेतलीय. यालाच सुब्रमण्यम स्वामी यांनी आव्हान दिलं आहे. यावर बोलताना ते म्हणाले, मी म्हणतोय, हा विकास प्रकल्प होणार नाही. फडणवीस जास्त बोलतील तर ते उपमुख्यमंत्रीही राहणार नाहीत. एवढी घाई कशासाठी आहे. तुम्हाला विकास करायचाच असेल तर दूषित चंद्रभागा नदी शुद्ध करा, इकडे विमानतळ बांधा, सोई सुविधा करा, इतके लोक दर्शनासाठी येतात. मंदिर परिसराचा विकास करा. या कॉरिडोरसाठी कोणाला नोटीसा पाठवणं हे चालणार नाही, असा इशारा सुब्रमण्यम स्वामी यांनी दिला आहे.
सुब्रमण्यम स्वामी ऐवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी, शिंदे फडणवीस सरकारवरतीही हल्लाबोल केला आहे. हे सरकार अनैतिक आहे. महाराष्ट्रात तोंडमोड करून बनवलेल हे सरकार आहे अशी घणाघाती टीका सुब्रमण्यम स्वामीयांनी केली आहे. त्यामुळे आता विरोधकांना आयते कोलित मिळणार हे मात्र नक्की.