बारावीच्या परिक्षेत कोकण विभागाने यशाची परंपरा ठेवली कायम; मुलींची यंदाही निकालात बाजी

मुंबई : (12th result is on website) आज बारावीच्या यंदाच्या वर्षीचा निकाल जाहीर झाला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकण विभागाने या निकालात बाजी मारली आहे. राज्याचा बारावीचा निकाल ९४.२२ टक्के इतका लागलाल असून मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे. कोकण विभाग: ९७.२१ टक्के, पुणे: ९३.६१, नागपूर: ९६.५२, औरंगाबाद: ९४.९७, मुंबई: ९०.९१, कोल्हापूर: ९५.०७, अमरावती: ९६.३४, नाशिक: ९५.०३, लातूर: ९५.२५

दरम्यान, दोन वर्षानंतर परिक्षा विभागाने ऑफलाईन परिक्षा घेतल्या. त्यानंतर सर्वांच्या या निकालाकडे नजरा लागल्या होत्या. आज निकाल जाहिर झाल्यानंतर देव पाण्यात ठेवलेल्या परिक्षार्थिंनी अखेर मोकळा श्वास घेतला. बारावीच्या नियमित विद्यार्थ्यांचा एकूण निकाल ९४.२२टक्के इतका लागला असून निकालात मुलींनी बाजी मारली आहे. फेब्रुवारी – मार्च २०२०च्या तुलनेत हा निकाल एकूण ३.५६ टक्क्यांनी वाढला आहे.

यंदा राज्याचा बारावीचा एकूण निकाल ९४.२२ टक्के लागला आहे. त्यापैकी मुलींचा निकाल ९५.३५ टक्के लागला असून मुलांचा निकाल ९३. २९ टक्के लागला आहे. राज्यात एकूण १४ लाख ८५ हजार ८२६ इतके विद्यार्थी बसले होते.

खाली दिलेल्या वेबसाईट निकाल पाहता येईल.
– www.mahresult.nic.in
– www.hscresult.mkcl.org
– https://hsc.mahresults.org.in

Prakash Harale: