यशासाठी हिंमत, विश्वास व प्रयत्न गरजेचे : आयुष प्रसाद

पुणे ः महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, मुंबई व यूथ एड फाउंडेशन संस्था पुणे मार्फत १० मे ते २० जून २०२२ कालावधीत आयोजित राज्यव्यापी उद्यमिता यात्रेची सांगता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत पुणे येथे झाली. राज्यातील विविध जिल्ह्यांतील उमेदवारांचे समुपदेशन करून स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी व त्या अनुषंगाने यूथ एड फाउंडेशन संस्थेमार्फत बीज भांडवल देण्यासाठी यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. सांगता कार्यक्रमात ३०० इच्छुक नवउद्योजकांना विविध स्वयंरोजगार सुरू करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

स्वयंरोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. त्या शोधून यश मिळविण्यासाठी हिंमत, विश्वास आणि प्रयत्न ही त्रिसूत्री महत्त्वाची आहे. उद्यमिता यात्रा यासाठी कार्य करीत असून, समाजामध्ये उद्योजकतेची मानसिकता रुजविण्यास यात्रेची मदत होणार आहे. आगामी काळात ४ हजार नवीन उद्योग सुरू करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरल्यास सुमारे २ लाख लोकांना याचा फायदा होऊ शकणार आहे, असे मत आयुष प्रसाद यांनी यावेळी व्यक्त केले. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या उपायुक्त अनुपमा पवार, सहायक आयुक्त कविता जावळे, अ‍ॅड.अविनाश साळवे, प्राचार्य डॉ.अनवर शेख, संग्राम खोपडे यांनी देखील यावेळी मार्गदर्शन केले.

Nilam: