शाहरूखची लेक बनली न्यूयॉर्कमधील ब्युटी ब्रँडची अॅम्बेसेडर! ‘या’ चित्रपटातून करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

मुंबई | शाहरुख खानची लेक सुहाना खान सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत असते. सुहाना ही लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार असल्याची चर्चा आहे, पण त्याआधीच तिला एक मोठी संधी मिळाली आहे. सुहाना न्यूयॉर्कमधील ब्युटी ब्रँड ‘मेबलिन’ची ब्रँड अॅम्बेसेडर बनली आहे. या कार्यक्रमातील काही फोटो व व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

सोमवारी मुंबईत आयोजित एका मीडिया इव्हेंटमध्ये सुहानाच्या संदर्भात ही घोषणा करण्यात आली. सुहानासोबतच बिझनेस विश्वातून अनन्या बिर्ला आणि मॉडेल एक्छा केरूंग या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. याशिवाय अभिनेत्री अनन्या पांडे आणि स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूसुद्धा तिथे हजर राहणार होत्या. मात्र काही कारणांमुळे या दोघी कार्यक्रमाला पोहोचू शकल्या नाहीत. सुहाना खान या वर्षी झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे, पण त्याआधीच तिला एका आंतरराष्ट्रीय ब्रँडची ब्रँड अॅम्बेसेडर बनण्याची संधी मिळाली आहे.

Dnyaneshwar: