चंद्रपूर | Women’s Day – आज (8 मार्च) जागतिक महिला दिन (International Womens Day). महिलांचा खास दिवस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दिवशी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या गायत्री रामटेके या तरूणीनं आत्महत्या करत स्वत:चं जीवन संपवलं आहे. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
गायत्री रामटेके या तरूणीनं सोशल मीडियावर स्वतःचा एक फोटो शेअर करत गळफास लावून आत्महत्या केली आहे. ती घुटकाला प्रभागात राहत होती. ग्रामीण भागातील ही तरुणी चंद्रपुरात शिक्षण घ्यायला आली होती. गायत्री शहरातील घुटकाला वार्डात भाड्याच्या घरात राहत होती. तसंच तिनं स्वतःचा सिंदूर असलेला एक फोटो शेअर केला होता. तिच्या या फोटोवर तिच्या मैत्रिणींनी लग्न झालं का? असा प्रश्न विचारला. तर त्या पोस्टमध्ये गायत्रीनं ‘हा माझा शेवटचा फोटो’ असं लिहीलं असून तिनं महिला दिनादिवशीच आत्महत्या करत जीवन संपवलं आहे.
दरम्यान, सदर आत्महत्या ही प्रेम प्रकरणातून झाली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तसंच पुढील तपास पोलीस करत आहेत. तर या तरूणीनं लग्न केलं होतं का याचाही शोध पोलीस घेत आहेत.