असं हे गाणं शोधून मी आणीन, म्हणजेच म्हणेन केवळ तुझ्याचसाठी. अत्यंत अफलातून कल्पनाविलास. आपल्या हाताशी न येणार्या इंद्रधनुष्यासारखा असला तरी एका अनवट क्षणी तो रंग चक्क मोरपिसावर येतो आपल्या हाताशी. अगदी जवळ.
जलते है जिस के लिये, तेरी आखों के दिये… रेशमाची लड सहज उलगडावी… इंद्रधनुष्याचे रंग मजेने मोरपिसावर पहुडावेत किंवा वळिवाच्या पहिल्या सरीने मातीचा गंध तनमन भरून राहावा तसं काहीसं हे गाणं ऐकताना होतं. अप्रतिम गाण्याच्या यादीत हे गाणं नसेल तर यादी कधीच पूर्ण होणार नाही आणि ‘सुजाता’शिवाय नूतनचा अभिनय प्रवास लिहिणे शक्य नाही. एका सामाजिक समस्येवर बिमल रॉय यांनी धाडसाने निर्माण केलेला ‘सुजाता’ हा चित्रपट. स्पृश्य-अस्पृश्यतेच्या पोकळ समजुतीला छेद देणारा. अस्पृश्यतेच्या ज्वलंत विषयाला हात घालताना वैराण परिस्थितीत प्रेमाचं नाजूक, हळवं फूल कसं उमलतं हे दाखवणारा आणि त्यातलं हे गाणं म्हणजे ऊन-सावलीचा परमोच्च बिंदू. तलतचा जीवघेणा व्याकुळ स्वर. अशाच गाण्यासाठी निर्माण झालेला. हृदयातली तार न् तार छेडणारा.
डोळ्यात पाणी कधी येतं पाण्यालाही नाही समजत, असं काही. त्यात हे गाणं काळजाच्या तळातून उमटतं. तो तिला म्हणतो, तुझ्या डोळ्यांतल्या या ज्योती ज्याच्यासाठी तेवतात त्यासाठीच मी गाणी शोधून आणली आहेत. हे गाणं दुःखद, एक कळ अश्वत्थाम्याच्या जखमेसारखी कायम वास्तव्यास आहे आणि तुझ्या डोळ्यात जादुई दिसते, थांबलेली. न जाणारी. खरं सांगू माझं हे गाणं नाजूकसं आहे. काळजाच्या कुपीत जपून ठेव. ओंजळीतून सुटलं तर पडेल, भंगून जाईल. काळजी घे आणि हेच नाजूक गाणं मी तुझ्यासाठी म्हणतो आहे. मजरुहनी शेवटचं कडवं अप्रतिम नजाकतीनं उतरवलं आहे. प्रेमाचं पूर्णत्व किंवा एकूणच प्रेम सफल व्हायचं असेल तर समर्पण आवश्यक असतं. माझं सुख, दुःख तुझं आणि तुझं सुख, दुःख माझं. श्वास आपले एकच असतील आणि जगण्याला पूर्णत्व यायचं असेल तर सायुज्यता निर्माण व्हायला पाहिजे.
हा सगळा प्रेमाचा तरल भाव मजरुहने अप्रतिमरीत्या उतरवला आहे. मजरुह सांगतात माझं गाणं तोपर्यंत परिपूर्ण होणार नाही जोपर्यंत तुझ्या मुखातून, ओठाला स्पर्श करून येत नाही. ते साधे नाहीत. तिचे ओठही रसभरे आहेत. तो रस माझ्या गाण्यात उतरणार आहे. (होटोसे छू लो तुम मेरा गीत अमर कर दो… आठवलं) नाहीतर ते तसेच आवारा बनून, भणंग होऊन फिरत राहतील. इथे ही मजा आहे. ते फिरतील कुठे तर तुझ्याच घनदाट केशसंभारातल्या बटांभोवती. असं हे गाणं शोधून मी आणीन म्हणजेच म्हणेन केवळ तुझ्याचसाठी. अत्यंत अफलातून कल्पनाविलास. आपल्या हाताशी न येणार्या इंद्रधनुष्यासारखा असला तरी एका अनवट क्षणी तो रंग चक्क मोरपिसावर येतो आपल्या हाताशी. अगदी जवळ. नूतनला आपण अस्पृश्य आहे हे समजलंय आणि आपण सुनील दत्तच्या लायक नाही अशी तिची समजूत आहे.
त्याचं प्रेम त्याला समजतंय पण तिला व्यक्त होता येत नाही. ती जे व्यक्त होते आहे ते त्याला समजत नाही आणि या सगळ्या अस्वस्थ प्रसंगात तिची सुरू असलेली उलघाल नूतनने अप्रतिमरीत्या दाखवली आहे. इथेही नायक, नायिका फोनवरून संभाषण करताहेत. तुम अपना रंजो गम सारखीच स्थिर, अचल अवस्था. असं हे गाणं शोधून मी आणीन, म्हणजेच म्हणेन केवळ तुझ्याचसाठी. अत्यंत अफलातून कल्पनाविलास. आपल्या हाताशी न येणार्या इंद्रधनुष्यासारखा असला तरी एका अनवट क्षणी तो रंग चक्क मोरपिसावर येतो आपल्या हाताशी. अगदी जवळ.
मधुसूदन पतकी