मुंबई | Sukesh Chandrashekhar’s Claim Nora Fatehi – 200 कोटींच्या मनी लाँड्रींग प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekhar) सध्या चांगलाच चर्चेत आहे. सुकेशसोबत आत्तापर्यंत अनेक बाॅलिवूड अभिनेत्रींची नावं जोडली गेली आहेत. यामध्ये ईडीनं अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) आणि नोरा फतेही (Nora Fatehi) यांचीही चौकशी केली आहे. तसंच या प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहे. यामध्ये आता सुकेश चंद्रशेखरनं (Sukesh Chandrashekhar) मोठा गौप्यस्फोट केला आहे.
काही दिवसांपूर्वी नोरा फतेहीनं सुकेशवर (Sukesh Chandrashekhar) गंभीर आरोप केले होते. त्यानं नोराला आपली गर्लफ्रेंड बनण्याची ऑफर दिली होती. तसंच त्या बदल्यात तो तिला आलिशान जीवनशैली आणि मोठा बंगला देणार होता.
आता नोराच्या या वक्तव्यावर सुकेशनं सांगितलं की, घर घेण्यासाठी नोरानं पैसे मागितले होते. मोरोक्कोमध्ये घर घेण्यासाठी मी नोराला पैसेही दिले होते. मी जॅकलीन फर्नांडिसला सोडावं अशी तिची इच्छा होती. ती मला त्रास देखील देत होती. आता ती स्वतःला वाचवण्यासाठी काहीही सांगत असल्याचं सुकेशनं सांगितलं आहे.