शिवसेनेला भगदाड पडणाऱ्या शिंदेंना सुमित राघवनने केला ‘हा’ सवाल!

मुंबई | शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळंच वळण आलं आहे. तसंच शिंदेंच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं आहे. या पार्श्वभूमीवर अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. या संदर्भात सोशल मीडियावर सर्वसाधारण व्यक्ती नाही तर सेलिब्रिटींपर्यंत सगळेच प्रतिक्रिया देत आहेत. तर यामध्ये आता अभिनेता सुमीत राघवननं देखील प्रतिक्रिया दिली आहे.

सुमीत राघवननं त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सुमीतने एका वृत्तपत्रिकेतील एक लेख शेअर केला आहे. हा लेख शेअर करताना सुमीत म्हणाला, एक साधा प्रश्न. माझ्या सारख्या सामान्य मुंबईकराला जेव्हा कळत होतं की जे झालं ते योग्य नव्हतं (म. वि. आ) तर मग एकनाथ शिंदे साहेब, तुमच्या सारख्या कट्टर शिवसैनिकाला, जो बाळासाहेबांच्या आणि खासकरून दिघे साहेबांच्या तालमीत तयार झाला आहे, अडीच वर्ष का लागावी हा निर्णय घ्यायला?

सुमीतने ही पोस्ट शेअर करताच नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये एक नेटकरी म्हणाला, “सुमीत भाऊ खुप वैचारिक प्रश्न मांडला आहे. कदाचित तुम्ही पुढे निवडणूक साठी उभे राहणार असे वाटत आहे.” यावर उत्तर देत सुमीत म्हणाला, “अहो वैचारिक प्रश्न विचारला तर मग राजकारणात कसा जाईन?”

Sumitra nalawade: