समर क्वीन, किंग, प्रिन्स, प्रिन्सेस सौंदर्य स्पर्धा २५ मार्च रोजी पुण्यात पार पडणार

पुणे : द डार्क शॅडो मोशन पिक्चर्स (The Dark Motion Pictures) निर्मित आणि दिग्दर्शक रामकुमार शेडगे प्रस्तुत समर क्वीन, किंग, प्रिन्स आणि प्रिन्सेस ही सौंदर्य स्पर्धा (Summer queen, King, prince, princess Beauty Contest) येत्या २५ मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता एस. फोर. जी. हॉटेल, थेऊर फाटा, पुणे – सोलापूर रोड, पुणे या ठिकाणी मोठ्या दिमाखात पार पडणार आहे. याप्रसंगी मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील विजय पाटकर, जयवंत वाडकर, स्मिता गोंदकर, गायक उत्कर्ष शिंदे, देव माणूस फेम बालकलाकार मिमी खडसे असे अनेक दिग्गज कलाकार या सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. पुण्याबरोबरच महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला आहे.

या स्पर्धेमध्ये अभिनेत्री व मॉडेल गुर्मीत कौर मान या सौंदर्य स्पर्धेचे मुख्य आकर्षण असणार असून, डॉ. अंजली आवटे, अभिनेता राहुल बोराडे जज्ज म्हणून काम पाहणार आहेत. त्याच बरोबर नक्षत्रचे गणेश तुम्मा, एस. फोर. जी हॉटेलचे शिवाजी जावळे, माध्यम प्रायोजक दैनिक राष्ट्रसंचार आहे. ग्रूमिंग विनोद टेमगिरे पाहणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश सोनी, हेअर मेकअप सुप्रिया देशपांडे, पूजा काठमवार, श्रद्धा दराडे, क्लॉथ डिझाईनर सोमय्या पठाण, पोस्टर सुजय दंताळे, आकाश जाधव हे काम पाहत आहेत.

Dnyaneshwar: