“ज्यांनी-ज्यांनी शिवसेना सोडली त्यांना बाळासाहेबांची हाय लागली”

 मुंबई : (Sunil Raut On Shinde Government) शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना रविवारी दि. 8 जे जे रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांचे भाऊ आमदार सुनिल राऊत बोलताना म्हणाले, शिवसेना हा पक्ष हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आहे. त्यांनी हा पक्ष कसा बांधला? किती कष्ट करून पक्ष बांधला? हे बंडखोर सर्व आमदारांना माहिती आहे.आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी शिवसेना पक्ष सोडला त्यांना बाळासाहेब ठाकरे यांची हाय लागली आहे असे सुनिल राऊत म्हणाले.

पुढे बोलताना सुनील राऊत म्हणाले, राज्यात ज्यावेळी शिवसेनेशी बंडखोरी करुन काही आमदार गुवाहाटीला जाऊन बसले, त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘वर्षा’ हे शासकीय निवासस्थान सोडले. त्यावेळी असंख्य महिलांच्या डोळ्यात अश्रू होते. हे अश्रू म्हणजे या चाळीस जणांना लागलेला तळतळात आहे.

देशातील सर्व कायदेतज्ञ म्हणतात, एक तर शिंदे गट निलंबित होईल किंवा त्यांना दुसऱ्या एका पक्षात विलीन व्हावे लागेल. मागील पाच आठवड्यापासून मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असे म्हणत आहे. मात्र, विस्तार काही केल्या होताना दिसत नाही. त्यांच्याकडून फक्त ‘तारीख पे तारीख’ देणे असेच सुरू आहे, असे राऊत म्हणाले.

Prakash Harale: