“संजय राऊतांच्या विरोधात ईडीला कोणतेही पुरावे हाती लागलेले नाहीत, त्यांना फक्त…”

मुंबई – Sanjay Raut ED : आज (रविवार, 31 जुलै) सकाळी ईडीकडून शिवसेनेचे फायरब्रँड नेते खासदार संजय राऊत यांच्या घरी धाड टाकण्यात आली होती. तब्बल नऊ तासाच्या चौकशीनंतर ईडीने राऊतांना ताब्यात घेतले. त्यावेळी राऊतांच्या घरासमोर शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील त्याठिकाणी वाढविण्यात आलेला होता.

संजय राऊत यांना ईडीकडून कार्यालयात घेऊन जाताना त्याठिकाणी राऊत यांच्या कुटुंबातील सदस्य देखील होते. राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली आहे. ‘ईडीला कोणत्याही प्रकारचे पुरावे हाती लागलेले नाहीत. त्यांना अटक करण्यात आली नाही; फक्त ताब्यात घेण्यात आलं आहे’ अशी प्रतिक्रिया सुनील यांनी दिली आहे.

संजय राऊत हे तपासात सहकार्य करत नसल्याच्या कारणामुळे राऊत यांना ईडीच्या कार्यालयात नेण्यात येत असल्याचं ईडी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेलं होतं.

Dnyaneshwar: