नवी दिल्ली : (Supreme Court New Date In Political issues) सुप्रीम कोर्टात सुरु असलेल्या राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणीवर सध्या फक्त ‘तारीख पे तारीख’ चालू आहे. सोमवारी होणारी सुनावणी आता पुढे ढकलण्यात आली असून पुढची संभाव्य तारीख शुक्रवार दि. 12 ऑगस्ट रोजी असणार आहे.
सध्याचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमना यांच्या निवृत्तीची तारीख 26 ऑगस्ट आहे. आणि त्यात ही सुनावणी लांबत असल्याने खंडपीठ हेच राहणार का? याबद्दलही प्रश्नचिन्ह अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. 12 ऑगस्टच्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाला काही सलग सुट्ट्या असल्यामुळे सुनावणीत आणखी काही काळ उलटणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तातडीच्या सुनावणीसाठी उद्धव ठाकरे गटाला सुप्रीम कोर्टाकडे पुन्हा मेन्शनिंग करावे लागेल. मात्र ती विनंती मान्य होईल का? हे देखील पहाणे महत्त्वाचे आहे.
दरम्यान, महाराष्ट्राचे सत्तासंघर्षासंदर्भात सर्वोच्च न्यायालयासमोर एकूण सहा याचिका आहेत. सर्व सहा याचिका एकत्रित करून घटनापीठाकडे देण्यास कोणीही अद्यापपर्यंत विरोध दर्शविलेला नाही. त्यामुळे सर्व सहा याचिका एकत्रितपणे घटनापीठाकडे सोपवल्या जातील अशी शक्यताही नाकारता येत नाही.