पुणे | राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार आता पहिल्यांदाच बारामती दौऱ्यावर येत आहेत. सत्तारांच्या या दौऱ्यावर सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे म्हणतात, “जे कोणी नेते बारामतीमध्ये येतात त्या सर्व नेत्यांचे आम्ही स्वागतच केले आहे आणि त्यांचही अर्थातच स्वागतच होईल. आमच्यावर अतिथी देवो भवेचे संस्कार झाले आहेत, अशी भूमिका त्यांनी जाहीर केली आहे.
खासदार सुप्रिया सुळेंनी शिंदे फडणवीस सरकारचा निषेध नोंदवला…
मागील अनेक महिन्यापासून जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुका घेण्यात याव्यात, अशी मागणी ईडी सरकारकडे करीत आहोत. तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी निवडणुका घेत नाही. त्यामुळे सर्व सामान्य नागरिक भरडला जात आहे. नगरसेवक नाहीत त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांनी प्रश्न कोणाकडे घेऊन जायचे. या गोष्टीच उत्तर ईडी सरकारने द्यावे, यावर हे सरकार भूमिका मांडणार नाही. त्यामुळे या ईडी सरकार निषेध व्यक्त करित खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे फडणवीस सरकारचा निषेध नोंदविला.