“राज्यपाल हे नियमित गुन्हेगार…”, सुप्रिया सुळेंची संतप्त प्रतिक्रिया

मुंबई | Supriya Sule On Bhagatsingh Koshyari Controversial Statement – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. राज्यपालांनी महाराष्ट्राचा अपमान केला आहे असं म्हणत विरोधकांसह सामान्य नागरिकांनी त्यांच्यावर सवाल उपस्थित केले आहेत. तसंच राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

‘प्रत्येकाला समान वागणूक देणे ही राज्यपालांची जबाबदारी आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे लोकांमध्ये तेढ आणि फूट निर्माण करीत आहेत. त्यांनी लोकांना दुखावले आहे आणि ते नियमित गुन्हेगार आहे. मी राष्ट्रपतींना राज्यपालांना हटवण्याची विनंती करते’, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दर दहा दिवसांनी दिल्लीला जातात. पुढच्या वेळी जेव्हा त्यांच्यापैकी एकाने दिल्लीला भेट दिली तेव्हा त्यांनी राज्यपालांना त्यांच्या मूळ राज्यात परत पाठवायला हवे, असं देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Sumitra nalawade: