“दत्त दत्त दत्ताची गाय…”, काव्यात्मक शैलीतून सुप्रिया सुळेंचा केंद्र सरकारला टोला!

मुंबई | Supriya Sule On Central Government – देशातल्या वाढत्या महागाईवर खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारला काव्यात्मक शैलीतून टोला लगावला आहे. आज (1 ऑगस्ट) लोकसभेत वाढत्या महागाईवर झालेल्या चर्चेत दिवंगत भाजप नेत्या सुषमा स्वराज यांची आठवण करुन देत सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. दत्त दत्त दत्ताची गाय, गाईचं दूध अन् दुधाची साय… ही मराठी कविता वाचत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, केंद्र सरकारने दत्तगुरू आणि गाय सोडून मधल्या सगळ्या गोष्टींवर जीएसटी लावला आहे.

सुप्रिया सुळे यांनी महागाईच्या मुद्द्यावर बोलताना मराठी कविता वाचून दाखवली. ‘दत्त दत्त दत्ताची गाय, गायीच दूध, दुधाची साय, सायीचं दही, दह्याचं ताक, ताकाचं लोणी, लोण्याच तूप’ ही कविता वाचत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, यातील दत्तगुरू आणि गाय सोडल्यास दूध, दही, ताक, लोणी आणि तूप या सगळ्यांवर केंद्रानं जीएसटी लावला आहे. पनीर, साखर, खोबरेल, तांदूळ यासारख्या सर्व वस्तूंवर जीएसटी लावलं आहे. 

केंद्र सरकार सातत्याने गेल्या 60 वर्षांच्या कामगिरीकडे बोट दाखवतं, पण आठ वर्षेपण खूप असतात. घरातली नवी सून पण इतक्या वर्षात तयार होते. तिलाही घराची जबाबदारी नाकारता येत नाही, असं देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Sumitra nalawade: