उपमुख्यमंत्र्याकडून मुख्यमंत्र्यांच्या मागे काहीतरी मोठं षडयंत्र होतंय – सुप्रिया सुळे

मुंबई : (Supriya Sule On Devendra Fadnavis) शुक्रवार दि.१५ रोजी सुप्रिया सुळे या पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त आल्या आसता यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, मुख्यमंत्री हे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक असतात, पण त्यांचा अपमान करण्याचं काम केलं जात आहे हे महाराष्ट्राला शोभणारं नाही. मुख्यमंत्र्यांचा अपमान म्हणजे राज्यातील जनतेचा अपमान असतो. मुख्यमंत्र्यांच्या मागे काहीतरी मोठं षडयंत्र केलं जात असल्याचाही यावेळी त्यांनी प्रत्यक्ष नाव न घेता भाजपवर आरोप केला.

दरम्यान, गुरुवार दि. १४ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकारपरिषद झाली होती. तेव्हा मुख्यमंत्र्याला देवेंद्र फडणवीसांनी एक चिठ्ठी लिहून दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. त्यानंतर विरोधीपक्षाकडून फडणवीसांना लक्ष करण्यात आलं आहे. पुढे बोलताना त्या म्हणाल्या, बंडखोर आमदार म्हणतात अजित पवारांनी फंड दिला नाही म्हणून आम्ही पक्ष सोडला. मी एक महिला म्हणून या आमदारांना एक प्रश्न विचारायचा आहे, विकास कामासाठी पैसे मिळत नाहीत, हिंदुत्ववासाठी, संजय राऊतामुळे अशा सर्व प्रश्नाच्या स्वाभिमानासाठी गेलात ना, मग आता तुमचा स्वाभिमान कुठे गेलाय?

मुख्यमंत्री कोणा एका पक्षाचा नसतो ते राज्याचा मुख्यमंत्री असतो. जर माझ्या राज्याच्या मुख्यमंत्र्याचा कोण अपमान करत असतील, तर माझा स्वाभिमान जागा आहे आणि जागा राहील. तसेच दिल्लीच्यासमोर हा महाराष्ट्र झुकला नाही आणि झुकू देणार नाही. मुख्यमंत्री कमकुवत दिसावेत लोकांच्या डोळ्यातून ते उतरावेत म्हणून, उपमुख्यमंत्र्याकडून मुख्यमंत्र्यांच्या मागे काही तरी मोठ षडयंत्र केलं जात आहे याची मला काळजी वाटत आहे.

Prakash Harale: