भावी महिला मुख्यमंत्री सुप्रियाताई सुळे! नाद नाय करायचा…; सुप्रिया सुळे यांच्या बॅनरची चर्चा

मुंबई | राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदासाठी तीन प्रमुख नावं आघाडीवर असल्याचं म्हटलं जातं. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार (Ajit Pawar), जयंत पाटील (Jayant Patil), खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) ही प्रमुख नावं मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत असतात. याचं कारण म्हणजे मुंबईतील राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयबाहेर ठराविक दिवसांच्या अंतराने लागलेले बॅनर. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सु्प्रिया सुळे यांचंही बॅनर मुंबईत लावण्यात आलं. या बॅनरवर सुप्रिया सुळे यांचा महाराष्ट्राच्या पहिल्या भावी महिला मुख्यमंत्री असा करण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे मुंबईतील राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर काही कार्यकर्त्यांनी हे पोस्टर लावलं होतं. पण नंतर पोलिसांनी लगेचच हे पोस्टर काढल्याची माहिती मिळत आहे.

नाद नाय करायचा…

महाराष्ट्राच्या पहिल्या भावी महिला मुख्यमंत्री सौ. सुप्रियाताई सुळे. नाद नाय करायचा! असा मजकूर या बॅनरवर लिहिला होता. तसंच या बॅनरवर सुप्रिया सुळे यांच्यासोबत त्याचे वडील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचाही फोटो आहे.

Dnyaneshwar: