“मानलं रे भाऊ…”, सूर्यकुमार यादवचं विराट कोहलीसाठी खास मराठीतून ट्विट

मुंबई | Surya Kumar Yadav On Virat Kohli – रविवार दि. 23 रोजी भारतीय संघानं टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान विरुद्ध रोमहर्षक सामन्यात थरारक विजय संपादन केला. मेलबर्नच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीनं (Virat Kohli) धमाकेदार कामगिरी केली. त्यानं 53 चेंडूत नाबाद 82 धावांचं मोलाचं योगदान देत भारताला विजय मिळवून दिला. तसंच विराटच्या या अफलातून खेळीचं जगभरातून कौतुक केलं जातंय. यामध्ये आता भारताचा आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादवनं (Surya Kumar Yadav) ट्विटरच्या माध्यमातून विराटचं खास मराठी भाषेत कौतूक केलं आहे.

भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या विराट कोहलीसाठी सूर्यकुमार यादवनं एक खास ट्विट केलं आहं. या ट्विटमध्ये सूर्यकुमार यादवनं पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यातील काही फोटो शेअर केले आहेत. तसंच या फोटोंखाली त्यानं कॅप्शमध्ये ‘मानलं रे भाऊ…’ असं लिहिलं आहे. सूर्यकुमार यादवचं हे खास ट्विट सध्या चांगलंच व्हायरल होतं आहे.

दरम्यान, टी-20 विश्वचषक 2022 चा पहिला सामना भारतानं पाकिस्तानसोबत खेळला. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्ताननं 20 षटकांत 8 बाद 159 धावा केल्या. प्रत्युत्तर देताना टीम इंडियानं या धावसंख्येचा पाठलाग करताना 20 षटकांत 6 विकेट गमावत 160 धावा केल्या आणि सामना 4 विकेटने जिंकला.

Sumitra nalawade: