‘सूर्यदत्त’च्या वतीने खा. हेमामालिनी सन्मानित

पुणे : प्रसिद्ध अभिनेत्री, परफॉर्मिंग आर्टिस्ट आणि खासदार पद्मश्री हेमामालिनी यांचा सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. ‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया आणि उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांनी ‘सूर्यदत्त’चा वैशिष्ट्यपूर्ण स्कार्फ व सन्मानपत्र देऊन हेमामालिनी यांना सन्मानित केले.

गणेश कला क्रीडामंच येथे आयोजित ३४ व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये हेमामालिनी यांनी ‘कृष्णलीला’ संकल्पनेवर शानदार बॅले नृत्याचे सादरीकरण करत उपस्थित ३००० पेक्षा अधिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. या वेळी चोरडिया दाम्पत्याने त्यांचा हा विशेष सन्मान केला. प्रसंगी पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी, उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य सहसंचालक डॉ. सतीश देसाई यांच्यासह पुणे फेस्टिव्हल टीमचे सदस्य उपस्थित होते. प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, ‘हेमा मालिनी या ज्येष्ठ अभिनेत्री, तसेच भारतीय जनता पक्षाच्या खासदार आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून त्या पुणे फेस्टिव्हलमध्ये आपल्या बहारदार नृत्य सादरीकरणाने चाहत्यांना मोहिनी घालतात. या वर्षीही ७३ वर्षीय हेमा मालिनी यांनी अत्यंत डौलदार आणि आकर्षक नृत्य सादर करत उपस्थितांची वाहवा मिळवली. त्यांचे सिनेमा, नाटक, नृत्य, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय असून, त्यांचा सन्मान आनंद देणारा आहे.’

Dnyaneshwar: