सूर्यकुमार यादवने रचला नवा इतिहास, एका सामन्यात दोन विक्रम करणारा पहिला खेळाडू

नवी दिल्ली : (Suryakumar Yadav created a new history) भारताचा पहिल्या फळीतील फलंदाज सूर्याकुमार यादव सध्या चांगल्याच फॉर्मात असल्याचे दिसून येत आहे. त्याने न्युझीलंडसोबतच्या एका सामन्यात त्याने दोन मोठे विक्रम रचले आहेत. आतापर्यंत एकाही फलंदाजाला असा विक्रम रचता आलेला नाही. तो इतिहास सुर्याने आपल्या नावे केला आहे.

यापूर्वी सूर्याने आशिया चषक आणि टी-२० विश्वचषकात धडाकेबाज फटकेबाजी केली होती. त्यामुळे या वर्षात सूर्याने दमदार धावा वसूल केल्या आहेत. न्युझीलंडसोबतच्या सामन्यात सूर्याने १११ धावा केल्या, त्यामुळे सूर्याच्या नावावर आता १,१५१ धावा झाल्या आहेत. ऐवढ्या धावा करणारा तो पहिला खेळाडू ठरल्याने, सूर्याने हा विक्रम रचला आहे आणि असा विक्रम रचणार तो पहिलाच भारताचा फलंदाज ठरला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात हा एक विक्रम सूर्याच्या नावावर झालेला आहे.

दुसऱ्या सामन्याचा हिरो ठरला तो सूर्यकुमार यादव. सूर्याने या सामन्यात फक्त शतक झळकावले नाही तर त्याने एक विक्रमही रचला. सूर्याने यावेळी भारताचा सिक्सर किंग युवराज सिंगचा विक्रमही मोडीत काढला आहे. आजच्या सामन्यात सूर्याने एकूण सात षटकार खेचले. या सात षटकारांसह त्याने युवीला मागे टाकले आहे. युवीने टी-२० क्रिकेटमध्ये ७४ षटकार लगावले होते.

पण आज सूर्याने सात षटकार लगावले आणि त्याच्या नावावर एकूण ७९ षटकार झाले आहेत. त्यामुळे सिक्सर किंग युवराज सिंगचा विक्रमही आता सूर्याने मोडीत काढला आहे. सूर्याची दुसऱ्या टी-२० सामन्यातील खेळी ही नजरेचे पारणे फेडणारी होती. सूर्याने १११ धावांची खेळी साकारली. यावेळी सूर्याने तब्बल सात षटकार लगावले, तर सूर्याने १७ चेंडूंमध्ये आपले दुसरे अर्धशतकही साजरे केलं.

Prakash Harale: