नव्या टी 20 रँकिंगमध्ये भारतीय खेळाडूंचा बोलबाला! ‘हा’ युवा खेळाडू अव्वल स्थानावर…

नवी दिल्ली : (Suryakumar Yadav tops ICC T20 rankings) आयसीसीने नुकतीच टी 20 रँकिंग यादी प्रसिद्ध केली आहे. न्यूझीलंडविरूद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यात सूर्यकुमार यादवने 51 चेंडूत 111 धावांची खेळी केली होती. यामुळे सूर्यकुमार यादवने आपले बॅटिंग क्रमवारीतील अव्वल स्थान कायम राखले आहे. तर भारतीय संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या रँकिंगमध्ये 50 व्या स्थानावर पोहचला आहे. सूर्यकुमार यादवला न्यूझीलंडविरूद्धच्या शतकाचा मोठा फायदा झाला असून त्याने आपले अव्वल स्थान पक्के करत दुसऱ्या स्थानावरील मोहम्मद रिझवान आणि त्याच्यामधील रेटिंग पॉईंटचा गॅप अजून वाढवला.

त्याने तीन सामन्यांच्या मालिकते 31 रेटिंग पॉईंट मिळवले. तो आता 890 रेटिंग पॉईंटवर असून त्याच्यात आणि दुसऱ्या स्थानावर असलेल्या मोहम्मद रिझवानच्यामध्ये 54 रेटिंग पॉईंटचा फरक आहे. न्यूझीलंडविरूद्धच्या शेवटच्या तिसऱ्या टी 20 सामन्यात कर्णधार हार्दिक पांड्याने नाबाद 30 धावा केल्या होत्या. त्यामुळे तो बॅटिंग रँकिंगमध्ये संयुक्तरित्या 50 व्या स्थानावर पोहचला आहे. तर अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारने दोन स्थानांचा सुधार करून 11 वे स्थान पटकावले. अर्शदीपनेही आपल्या रँकिंगमध्ये सुधारणा करत 21 वे स्थान मिळवले आहे. तर फिरकीपटू युझवेंद्र चहलने आठ स्थांनीची झेप घेत 40 वे स्थान पटकावले.

भारताची रन मशिन विराट कोहली वनडे बॅटिंग रँकिंगमध्ये सहाव्या स्थानावर विराजमान झाला आहे. तर कर्णधार रोहित शर्मा आठव्या स्थानावर आहे. दुखापतीमुळे मैदानापासून दूर असलेला जसप्रीत बुमराह 11 व्या स्थानावर घसरला आहे. भारत आता न्यूझीलंडसोबत शुक्रवारपासून तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. या संघाचे नेतृत्व शिखर धवन करणार असून विराट कोहली, रोहित शर्मासह संघातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.

Prakash Harale: