मुंबई : (Sushama Andhare On Kirit Somaiya) केंद्रीय मंत्री नारायण राणेंना जुहू येथिल ‘अधीश’ बंगल्यातील काही अनधिकृत बांधकाम प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून दणका बसला आहे. उच्च न्यायालयाने दिलेले कारवाईचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवत राणेंची याचिका फेटाळली आहे. यावरून शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, यावेळी सुषमा अंधारे भाजप नेते किरीट सोमय्यांना म्हणाल्या, राज्यात जरा काही खुट्ट झालं तरी स्वयंघोषित अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आणि समाजसुधार मोठ्या तत्परतेने व्यक्त होतात. काही दिवसांपुर्वी अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी कोकणात हातात हातोडा घेऊन गेले होते.
मात्र, त्यांच्या शेजारी राणेंच्या अधीश बंगल्यातील अनधिकृत बांधकाम पाडण्याबाबत उच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर किरीट सोमय्या शांत होते. ही सहनशीलता सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईलपर्यंत सोमय्यांनी दाखवली आहे,” असा खोचक टोला अंधारे यांनी सोमय्यांना लगावला आहे.
भाजपाचे पूर्णवेळ ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि अतिक्रमण विभागाचे सहाय्यक किरीट सोमय्या आता हातोडा घेऊन अधीश बंगल्यावर जाण्याचा मुहूर्त कधी काढणार आहेत. की नवरात्रौत्सवात गरबा खेळण्यातून वेळच मिळणार नाही,” असा टोमणाही सुषमा अंधारे यांनी सोमय्यांना मारला आहे.