ललित पाटील प्रकरणावरून सुषमा अंधारे देवेंद्र फडणवीसांवर संतापल्या; म्हणाल्या, “संपवून टाकाल का….”

मुंबई | Sushma Andhare : ड्रग्ज माफिया ललित पाटीलला (Lalit Patil) पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ललित पाटीलला अटक केल्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी राज्य सरकारमधील काही मंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. यामध्ये मंत्री दादा भुसे आणि शंभूराज देसाई यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी अंधारेंनी केली होती. तसंच त्या दोघांवर त्यांनी गंभीर आरोप देखील केले होते. तर दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ललित पाटीलला अटक झाली असून आता सर्वांची तोंडं बंद होतील आणि दोषींवर योग्य कारवाई करू, असं म्हटलं होतं. तर आता सुषमा अंधारेंनी फडणवीसांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, तुम्ही तोंड बंद करणार म्हणाले नेमकं काय करणार? संपवून टाकाल का? जसं नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना अडकवलं तसं अडकवाल का? देवेंद्र फडणवीस तुम्ही एका पक्षाचे नेते नसून राज्याचे गृहमंत्री आहात.

महाराष्ट्राचा उडता पंजाब झाला नाही पाहिजे. जो कोणी ड्रग्जच्या विरोधात बोलेल त्यानं शांत राहावं, अशी धमकी तुम्ही देत आहात. तर मग ललित पाटील नावाच माणूस पळालो नाही तर मला पळवलं, असं का म्हणतो याचा शोध घ्या, असंही सुषमा अंधारे म्हणाल्या.

Sumitra nalawade: