पवारांच्या संभाजी महाराजांविषयीच्या विधानावर अंधारेंची कडक प्रतिक्रिया; म्हणाल्या…

पुणे : (Sushma Andhare On Ajit Pawar) सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याकडून अभिवादन करण्यात आलं. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, ज्यांच्यामुळे आम्ही लिहू, वाचू शकत आहेत, व्यवस्थेला ठामपणे प्रश्न विचारू शकतो अशा माऊलीचा जन्मदिवस आहे. आम्ही त्यांना अभिवादन करण्यासाठी माहेरी आलो आहोत. महिलांचे प्रश्न अजूनही अनुत्तरीत का आहेत? राज्याच्या विधिमंडळ महिलांसाठी एक जागा टक्का का असू नये. पुरुष सत्तेचे वाहक प्रबळ आहेत का? की महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही, असा सवाल त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला केला.

पुढे अंधारे म्हणाल्या की, भाजपला नॉन इश्यू विषयावर चर्चा करण्याची सवय आहे. धर्मापेक्षा राष्ट्र मोठा आहे आणि राष्ट्रासाठी छत्रपती संभाजी महाराज लढले असतील तर धर्मरक्षक असा उल्लेख केला असेल तर ती फोर मोठा इश्यू करण्याची गोष्ट नाही. राज्यपालांनी जेव्हा सावित्रीबाई यांच्या बद्दल अर्वाच्च टीका केली तेव्हा हे लोक गप्प बसले होते. त्यावेळी या तथाकथित भाजपच्या महिला कुठल्या बिळात जाऊन लपल्या होत्या. तेव्हा राज्यपाल यांचा राजीनामा का नाही मागितला अशा शब्दात हल्लाबोल केला आहे.

तर चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्या वादात उडी घेत भाजप महिला नेत्यांवर हल्लाबोल केला आहे. अमृता वहिनी ज्या कार्यक्रमात होत्या त्याच कार्यक्रमात रामदेव बाबा यांनी जे वक्तव्य केलं तेव्हा कोणी आक्षेप घेतला नाही. अमृता फडणवीस, कंगना राणावत यांनी काय कपडे घालावेत हा त्यांचा व्यक्तिगत अधिकार आहे. जो न्याय तुम्ही इकडे वापरतात तो न्याय तिकडे का नाही वापर करत. मी काल ज्यांचे फोटो पोस्ट केले त्यांच्या पेहरावर माझा आक्षेप नाही असं नाही असंही पुढे त्या म्हणाल्या आहेत.

Prakash Harale: