“सध्या ‘लीडर’ कमी अन् ‘डीलर’ जास्त झालेत…”, सुषमा अंधारेंचा खोचक टोला

अमरावती | Sushma Andhare – सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्यात ठाकरे गट (Thackeray Group) विरूद्ध शिंदे गट (Shinde Group) असा कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे. ठाकरे गट आणि शिंदे गटातील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. अशातच ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.

सुषमा अंधारे म्हणाल्या की, आपल्याला जो व्यक्ती पटत नाही, ज्याचे विचार पटत नाहीत,‎ त्याच्यावर शाई फेकू नका, मग तो कोणताही‎ राजकारणी असो. ती शाई फेकण्यापेक्षा गोळा करा‎ आणि मतदानाच्या वेळी तीच बोटावर लावून‎ निवडणुकीच्या काळात त्या शाईची किंमत त्यांना‎ दाखवून द्या. जेणेकरून त्यानंतर त्यांना बोलण्यासाठी‎ संधीच मिळणार नाही. रक्ताचा थेंब न सांडवता‎ परिवर्तन करा, लोकशाहीचा लढा असाच असला‎ पाहिजे. कारण तुमची आमची ही ताकद‎ मतपत्रिकेतून दाखवा.

सुषमा अंधारे या चांदूर रेल्वे येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती‎ उत्सव समितीद्वारे आयोजित शिवजयंती उत्सव‎ कार्यक्रमात सोमवारी (20 फेब्रुवारी) रात्री बोलत होत्या. आज‎ शिवाजी महाराज असते तर त्यांनी आजही गद्दारांचा‎ कडेलोट केला असता, असा उल्लेख करत आज‎ लीडर कमी आणि डीलर जास्त झाले आहेत, असा खोचक टोला त्यांनी लगावला.

पुढे त्या म्हणाल्या की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)‎‎‎‎‎‎‎‎‎‎ आग्रा येथे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांची‎ जयंती साजरी करतात. पण ज्यावेळी तत्कालीन‎ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी महाराजांबद्दल‎ अवमानकारक भाष्य केलं होतं, त्यावेळी ते शांत होते.‎ तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis)‎ कोश्यारींचा निषेध करणारा एक ठरावही‎ विधानसभेत मांडला नाही, यावरून शिंदे आणि‎ भाजप यांची भूमिका लक्षात येते, अशी टीका‎ही सुषमा अंधारेंनी केली.

Sumitra nalawade: