‘आम्हाला माफ करा.. ‘सुषमा अंधारेंचं छत्रपती शिवाजी महाराजांना भावनिक पत्र

मुंबई : (Sushma Andharen emotional letter to Chhatrapati Shivaji Maharaj) शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाचा निकाल लागल्यानंतर राज्याचे वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निकाल जाहीर केला. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या फायर ब्रँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुषमा अंधारे यांनी भावनिक पत्र लिहिलं आहे. जे सध्या चर्चेत आलं आहे.

देशभरात आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या जल्लोशात साजरी केली जात आहे. याच निमित्ताने ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंंधारे यांचे भावनिक पत्र सध्या व्हायरल होत आहे. ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला माफ करा, असे म्हणत राज्याच्या राजकारणावर भाष्य केले आहे.

आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज,
आम्हाला माफ करा..आज तुमच्या जन्मदिनी,स्वतःला मावळा म्हणणाऱ्या ढोंगी कावळ्याच्या हस्ते, वाद्याचं कातडं पांघरलेल्या धूर्त लांडग्यांच्या हस्ते, शिवसैनिक नाव लावणाऱ्या फितुराच्या हस्ते, किल्ले शिवनेरीवर तुमचा गौरव केला जातोय..

तुमच्या हयातीत गद्दार ताठ मानेने फिरतोय, असे कधीही घडले नाही… पण ह्यापुढे पुन्हा कधी असा अधर्म घडणार नाही,असे वचन आम्ही तुम्हाला देतो..

शिवश्रध्दा आणि शिवनिष्ठा मनी आहेच, फक्त ह्या गनिमांशी लढण्याचे बळ द्या! स्वराज्य पुन्हा स्थापन करण्याची ऊर्जा द्या! आणि ह्या अधर्मयुध्दात विजयी होण्याचा आशीर्वाद द्या!

हर हर महादेव !!तुमचा खरा मावळा,सच्चा शिवसैनिक

Prakash Harale: