मुंंबई | Rajeev Sen’s Reaction To Sushmita Sen’s Relationship – सध्या बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन तिच्या लव्ह लाइफमुळे चर्चेत आली आहे. आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी यांनी सोशल मीडियावर सुष्मिता सेनसोबतच्या नात्याची कबुली दिली आहे. त्यानंतर या दोघांच्या नात्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे. एवढंच नाही तर त्यांच्या लग्नाच्याही चर्चा रंगल्या होत्या मात्र नंतर ललित मोदी यांनी यावर स्पष्टीकरण देत केवळ डेट करत असल्याचं म्हटलं आहे. या सगळ्यावर अद्याप सुष्मिताने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही पण तिचा भाऊ राजीव सेननं मात्र यावर प्रतिक्रिया दिली आहे.
सुष्मिता सेनच्या अफेअरच्या चर्चा सोशल मीडियावर होत असताना तिच्या कुटुंबीयांसाठी मात्र ही गोष्ट हैराण करणारी असल्याचं तिचा भाऊ राजीव सेननं म्हटलं आहे. राजीवने ‘टाइम्स नाऊ’शी बोलताना सुष्मिता आणि ललित मोदी यांच्या नात्यावर प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत आपल्याला कोणतीही कल्पना नव्हती असं त्यानं सांगितलं आहे. तर ‘इंडिया टुडे’शी बोलताना त्यानं, “या वृत्तामुळे मला धक्का बसला असला तरीही माझ्या बहीणीसाठी मी खुश आहे” असं म्हटलं आहे.
यावेळी राजीव सेन म्हणाला, “मला यातल्या कोणत्याच गोष्टी माहिती नव्हत्या. मी अजूनही माझ्या बहिणीशी यावर बोललेलो नाही. तिच्याशी बोलल्यानंतरच मी यावर काही प्रतिक्रिया देऊ शकतो. सध्या तरी यावर मी काही बोलणं योग्य नाही. पण मी माझ्या बहिणीसाठी खूप खुश आहे.”