मद्रास : मद्रास हायकोर्टाने एका घटस्फोटाच्या खटल्याचा निर्णय देताना पती किंवा पत्नीने आपल्या जोडीदाराच्या चारित्र्यावर संशय घेणं हे मानसिक क्रूरता असल्याचं म्हटलं आहे. या खटल्यातील न्यायमूर्ती व्हीएम वेलुमणी आणि न्यायमूर्ती एस सौंथर यांच्या खंडपीठाने सी. शिवकुमार यांच्या घटस्फोटाला परवानगी दिली आहे.
या प्रकरणात शिवकुमार यांच्या पत्नी श्रीविद्या यांना पतीच्या चारित्र्यावर संशय होता. त्यामुळ त्यांनी पतीच्या कार्यालयात जाऊन धिंगाणा घातला होता. विद्या यांनी कसलाही पुरावा नसताना शिवकुमार यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्याचबरोबर शिवकुमार यांच्या चौकशीसाठी कॉलेजमध्ये देखील त्या गेल्या होत्या. शिवकुमार यांचे कॉलेजमधील विद्यार्थिनी आणि कर्मचाऱ्यांशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला होता.
खंडपीठाने म्हटले आहे की, श्रीविद्या यांनी पुरावा नसताना पतींच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांची प्रतिमा खराब केली आहे. त्यांचे हे कृत्य हिंदू विवाह कायद्याच्या कलम १३(१)(a) अंतर्गत मानसिक क्रूरता आहे. कौटुंबिक न्यायालयाने शिवकुमार यांनी दाखल केलेला घटस्फोटाचा अर्ज कृर्तेच्या कारणामुळे फेटाळला होता त्यानंत त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.