संपदा सहकारी बँकेच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याला फडणवीस यांची उपस्थिती

‘अर्थसाक्षरता अभियानाला’ प्रारंभ

पुणे : (Suvarnamahotsav ceremony Celebrations of Sampada Cooperative Bank) संपदा सहकारी बँक लि. पुणे च्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त सुवर्ण महोत्सवी ‘संपदा’ शुभारंभ सोहळा रविवार, दिनांक ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० वाजता टिळक स्मारक मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा होणार आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष अश्विनीकुमार उपाध्ये यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला बँकेचे उपाध्यक्ष महेश लेले, मुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश सरदेशपांडे, व्यवस्थापन मंडळ अध्यक्ष मुकुंद भालेराव आदी उपस्थित होते. महेश लेले म्हणाले, या सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून रा.स्व.संघाचे पश्चिम महाराष्ट्राचे संघचालक सुरेश ऊर्फ नाना जाधव, अम्ब्रेला ऑर्गनायझेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल खिरवाडकर यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमात सुवर्ण महोत्सवी वर्ष बोधचिन्ह अनावरणासह अर्थसाक्षरता अभियानांतर्गत पुस्तिकेचे प्रकाशनही होणार आहे.

Prakash Harale: