मुंबई : (Swapneel-Shivani New Movies Jilebi) 2023 वर्षे मराठी प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरले आहे. मागील वर्षभरात मराठी सिनेसृष्ठीमध्ये अनेक चित्रपटांनी आगमन केले आहे. याच वर्षी जानेवारी २०२३ मध्ये स्वप्नील जोशी-शिवानी सुर्वे यांचा वाळवी सिनेमा प्रचंड गाजला. वाळवी सिनेमा रिलीज झाला. सिनेमाला सुरुवातील थंड प्रतिसाद होता. पण नंतर केवळ माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर सिनेमाने प्रचंड यश संपादन केलं.
वाळवी मध्ये गाजलेली जोडी म्हणजे अभिनेता स्वप्नील जोशी आणि अभिनेत्री शिवानी सुर्वे. आता वाळवीनंतर स्वप्नील-शिवानी नवीन सिनेमातुन एकत्र येणार आहेत. त्यांच्या सोबतीला आहे प्रसाद ओक असणार आहे. आजच या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे.
स्वप्नील-शिवानी आगामी जिलबी सिनेमातुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. जिलबी सिनेमाच्या शुटींगला आजपासुन सुरुवात झाली आहे. प्रसाद ओक शुटींगचा फोटो शेअर केलाय. नितीन कांबळे यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.
सिनेमात स्वप्नील जोशी आणि शिवानी सुर्वे यांची भुमिका नेमकी काय हे अद्याप गुलदस्त्यात आहे. वाळवी सिनेमात स्वप्नील आणि शिवानी या जोडीने धम्माल उडवली होती. दोघांची केमिस्ट्री अनेकांना आवडली. आता जिलबी निमित्ताने स्वप्नील – शिवानीची जोडी पुन्हा कशी धम्माल उडवणार हे पाहायचं आहे.