स्वप्निल जोशी मराठी लिखाणात फेल; अन् नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाला, ‘पाउल, पाढते आणि वैनी’

मुंबई : (Swapnil Joshi Troll) प्रसिद्ध अभिनेता स्वप्निल जोशी (Swapnil Joshi) हा त्याच्या चित्रपटसृष्टीतील अभिनयामुळे चर्चेत असतो. त्याच्या चित्रपटांना प्रेक्षकांची कमालीची पसंती देत डोक्यावर घेतलं. दुनियादारी (Duniyadari), तू ही रे (Tu Hi Re),मुंबई-पुणे-मुंबई (Mumbai-Pune-Mumbai) यांसारख्या चित्रपटांमध्ये स्वप्निलनं खुप छान काम केलं अशी प्रक्षेकांची नेहमी मत असतात.

स्वप्निल त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतो. स्वप्निलचा वाळवी हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली आहे. सध्या स्वप्निल हा त्याच्या एका ट्वीटमुळे चर्चेत आहे. स्वप्निलनं ट्वीट शेअर करुन वेड या चित्रपटाच्या टीमचं कौतुक केलं. पण या ट्वीटमधील तीन शब्द त्यानं चुकवले. आता या ट्वीटमुळे सध्या त्याला नेटकरी ट्रोल करत आहेत.

स्वप्निलनं ट्वीटमध्ये लिहिलं, ‘वेड आज बॉक्स ऑफिसवर 50 कोटीचा गल्ला पार करेल. केवळ क. मा. ल. कामगिरी ! मराठी पाउल पाढते पुढे! मनापासून अभिनंदन रितेश भाऊ, जिनिलियावैनी आणि पूर्ण टीम!’

स्वप्निलच्या या ट्वीटमधील पाउल, पाढते आणि वैनी या शब्दांनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधले. स्वप्निलच्या ट्वीटला एका नेटकऱ्यानं रिप्लाय केला, अरे कसली भाषा तुमची.. वहिनी, असं असतं ते.. म्हणे मी पुण्याचा..’ तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, ‘जिनिलिया वहिनी नॉट वैनी रे, म्हणून मराठीत बोला ,आणि मराठी SRKहे बालिश ढोंग करू नका,’ ‘मराठी व्यवस्थित लिहा जोशी आधी, पाढते? वैनी? पाउल?’ अशी कमेंट देखील एका नेटकऱ्यानं केली. त्यामुळे स्वप्निल जोशी मराठी लिखानात फेल झाला, अन् नेटकऱ्यांकडून ट्रोल झाला असं म्हणता येईल.

.

Prakash Harale: