“संघी लोकांनी किमान मानलं तरी…” स्वरा भास्करला ट्रोल करणाऱ्यांना फहादचे उत्तर

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने समाजवादी पार्टीचा नेता फहाद अहमदशी नुकतंच कोर्ट मॅरेज केलं आहे. त्याचे फोटोही दोघांनी सोशल मीडियावर शेयर केले आहेत. स्वरानं अचानक लग्न केल्यामुळं तिच्या अनेक चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. स्वरा आणि फहादने 16 फेब्रुवारीला मुंबईत स्पेशल मॅरेज कायद्यानुसार लग्नसोहळा उरकला आहे. स्वरा आणि फहादच्या लग्नाची बातमी समोर येताच तिला तिच्या एका जुन्या ट्वीटवरून खूप ट्रोल करण्यात आलं होतं. त्या ट्रोलिंगला फहादने चांगलेच उत्तर दिले आहे.

स्वरा भास्करने काही दिवसांपूर्वी एक ट्वीट केलं होतं. ज्या ट्वीटमध्ये तिने पती फहादला भाऊ असं म्हणून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. स्वराचं हे ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं. तिने या फोटोच्या कॅप्शनमध्ये “जन्मदिनाच्या शुभेच्छा फहाद मिया. भावाचा आत्मविश्वास असाच कायम राहो. आनंदी राहा आणि असंच काम करत राहा. आता वय वाढत चाललंय, लग्न कर. तुझा वाढदिवस आणि हे संपूर्ण वर्ष तुझ्यासाठी चांगलं जाओ मित्रा,” असं लिहिलं होतं. त्यावरून त्यांना ट्रोल केलं गेलं होतं, त्याला फहादने उत्तर दिलंय.

“चला किमान संघी लोकांनी हे तर मान्य केलं की हिंदू व मुस्लीम भाऊ-बहीण असू शकतात. आता पती-पत्नी देखील विनोद करू शकतात, हेही मान्य करून घ्या,” असं फहाद अहमदने ट्वीट करत म्हटलं आहे.

Dnyaneshwar: