Viral Video | जेव्हा मृत्यू जवळ येतो किंवा मृत्यू समोर दिसतो तेव्हा काय वाटतं. मृत्यूपूर्वी नेमकं काय होतं. जीवन आणि मृत्यूच्या मध्ये काय घडतं ? असे कितीतरी प्रश्न कित्येकांना पडतात. फक्त मरणाच्या दारात असलेल्याच नव्हे तर प्रत्येकाला जीवन-मृत्यूमधील भयावह दृश्य दाखवणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात वायरल होतोय.
हा व्हिडीओ चीनमधील आहे. स्विंगमध्ये दोन राऊंड काउंट होते. या पैकी एका मोठ्या वर्तुळात लोक बसतात आणि स्विंग पेंड्युलम त्यांना उचलून घेतो. यानंतर तो खाली येतो. जसा आकाशात स्विंग पेंड्युलम वर चढला. गरजेपेक्षा जास्त लोक या स्विंग पेंड्युलमवर चढले आणि हा स्विंग पेंड्युलम आकाशात वर जाताच त्याची पेंडुलम राइड तिथेच थांबली. ते पाहून खळबळ उडाली, कारण ज्या ठिकाणी लोक आभाळापर्यंत पोहोचले त्या ठिकाणी स्विंग पेंड्युलम थांबला आणि उलटा लटकला. सुदैवाने लोक त्यात व्यवस्थित बांधलेले होते. तसे नसते तर ते पडू शकले असते.
पण उद्या कुणासोबतही असं काही घडू शकतं. कदाचित या जागी तुम्ही किंवा तुमची प्रिय व्यक्ती असू शकते. त्यामुळे अशा राइडमध्ये बसताना सावधान.