ऑस्ट्रेलियाची दमदार सुरूवात! ‘पाॅवर प्ले’मध्ये सहा षटकांत शुन्य बाद 43 धावा

T20 WC INDW vs AUSW : महिला टी 20 वर्ल्डकप 2023 मध्ये आज पहिल्या सेमी फायनल सामन्यात भारताचा मुकाबला हा पाचवेळच्या विजेत्या बलाढ्य ऑस्ट्रेलियासोबत होत आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतासाठी हा सामना एका गणिताच्या अवघड पेपर सारखाचं आहे. मात्र या पेपरपूर्वीच भारतीय संघाला दुखापतींनी ग्रासले आहे.

भारताची अष्टपैलू खेळाडू पूजा वस्त्रकार आणि कर्णधार हरमनप्रीत कौर देखील आजच्या सामन्यात खेळणार की नाही याबाबत साशंकता होती. मात्र कर्णधार हरमनप्रीत कौर सेमी फायनल सामना खेळणार आहे. राधा यादव देखील आजारी आहे. त्यामुळे भारतासमोर बलाढ्य ऑस्ट्रेलियाचे आव्हान समोर आहेच मात्र भारताला दुखापतींचा देखील सामना करावा लागणार आहे.

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पहिल्या तीन षटकात बिनबाद 21 धावा केल्या. एलिका हेलेने आक्रमक फलंदाजी केली तर बेथ मूनीने तिला सावध साथ दिली.

Prakash Harale: