मुंबई | Taapsee Pannu’s Statement In Discussion – बाॅलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ती नेहमी हटक्या स्वभावामुळे आणि परखड बोलण्यामुळे चर्चेत येत असेत. आता तापसी पन्नू अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘दोबारा’ चित्रपटात दिसणार आहे. सध्या तापसी दोबाराचे प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. यावेळी बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता करण जोहरनं तिला आपल्या शो मध्ये बोलावलं होते. मात्र तापसीनं त्याला नकार दिला आहे. तसंच तिनं नकार देण्याचं कारण जेव्हा सांगितलं तेव्हा मात्र तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
यावेळी तापसी म्हणाली, आपल्याला त्या शोमध्ये जायचं नाही. करणनं बोलावणं काही धाडलेलं नाही. आणि तशीही माझी सेक्स लाईफ काही फार मजेशीर नाही. त्यामुळे मला त्या शोमध्ये जाण्यात काहीही रस नाही, असं तापसीनं म्हटलं आहे. तसंच तापसीनं अशी प्रतिक्रिया देण्यामागील कारण म्हणजे करण या शोमध्ये सहभागी होणाऱ्या कलाकारांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत जास्त प्रश्न विचारतो. त्यांच्या सेक्स लाईफवरुन देखील त्यानं प्रश्न विचारले आहेत. त्यामुळे तापसीनं तो संदर्भ लक्षात घेऊन करणला टोला लगावला आहे.
दरम्यान, कॉफी विथ करणच्या 7 व्या पर्वामध्ये जितके सेलिब्रेटी सहभागी झाले आहेत त्यांनी आपल्या सेक्स लाईफबद्दल मोठे खुलासे केले आहेत. त्यामुळे त्यात येणाऱ्या नवीन कलाकारांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल रंजक माहिती द्यावी. अशी धारणा आता चाहत्यांची झाली आहे, असं तापसीला वाटते. त्यासाठी तिनं आपल्याला त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यात रस नसल्याचं म्हटलं आहे.