गुरुचरण सिंगने बेपत्ता होण्यापूर्वी पाठवलेला ‘तो’ मेसेज; मैत्रिणीने केला मोठा खुलासा

Blue Guest Featured Live Event Twitter Post 96Blue Guest Featured Live Event Twitter Post 96

Gurucharan Singh : छोट्या पडद्यावरील तारक मेहता का उल्टा चष्मा या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. सध्या या कार्यक्रमातील रोशन सोढी ही भूमिका साकारलेला अभिनेता गुरुचरण सिंग हा चर्चेत आहे. गुरुचरण हा बेपत्ता झाला आहे. त्याच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात जावून गुरुचरण बेपत्ता झाल्याची खबर दिली. अशातच आता गुरुचणच्या बाबतीत एक मोठी अपडेट समोर आली आहे. निर्माते जेडी मजीठिया यांनी याप्रकरणी मोठी माहिती दिली आहे.

जेडी मजीठिया यांनी सांगितल्यानुसार, त्यांना एक फोन आला. हा फोन गुरुचरण सिंग यांची खास मैत्रीण भक्ती सोनी यांचा होता. भक्ती सोनी यांनी जेडी मजीठिया यांना फोन करुन गुरुचरण सिंग याच्याबद्दल सांगितलं.

गुरुचरण सिंग मुंबईत येणार होते. अभिनेता 22 एप्रिल रोजी दिल्ली येथून विमानासाठी घरुन निघाला होता. पण अभिनेता मुंबईत देखील पोहोचला नाही आणि अभिनेता पुन्हा घरी देखील गेला नाही. भक्ती सोनी अभिनेत्याला घेण्यासाठी मुंबई विमानतळावर देखील पोहोचल्या होत्या. पण गुरुचरण सिंग मुंबईत आलाच नसल्याची माहिती मिळत आहे.

भक्ती सोनी यांनी विमानतळ अधिकाऱ्यांकडे विचारपूस केल्यानंतर अभिनेता विमानात बसलाच नसल्याची माहिती समोर येत आहे. पण धक्कादाक गोष्ट म्हणजे विमानात बसण्यापूर्वी गुरुचरण सिंग यांनी भक्ती यांना ‘बोर्ड करण्यासाठी जात आहे…’ असा मेसेज केला होता. अशात अभिनेता विमात बसलाच नाही, मुंबईत उतरला नाही? तर अभिनेता गेला कुठे? यांसारखे अनेक प्रश्न याठिकाणी उपस्थित होत आहेत.

निर्माते जेडी मडीठिया म्हणाले, ‘गुरुचरण सिंग याचे आई – वडील मुलाचा शोध घेत आहेत. पोलिसांमध्ये तक्रार देखील दाखल कण्यात आली आहे. गुरुचरण सिंग याचे आई – वडील वृद्ध आहे आणि ते सतत आजारी देखील असतात..’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त गुरुचरण सिंग याची चर्चा रंगली आहे.

Rashtra Sanchar Digital:
whatsapp
line