‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ च्या बबितानं टप्पूसोबत गुपचूप उरकला साखरपुडा?

Blue Guest Featured Live Event Twitter Post 29Blue Guest Featured Live Event Twitter Post 29

मुंबई | ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका घराघरात प्रचंड लोकप्रिय आहे. तसेच या मालिकेत काम करणारे कलाकार सुद्धा तेवढेच प्रसिद्ध आहे. आता याच मालिकेत बबिता जी ही भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता (Munmun Dutta) आणि याच मालिकेतील टप्पू म्हणजे अभिनेता राज अनाडकतशी (Raj Anadkat) साखरपुडा केला असल्याची बातमी समोर आली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला आपापल्या कुटुंबियांच्या उपस्थितीत दोघांनी साखरपुडा केला असल्याचं बोललं जातंय.

एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीने याबाबत खुलासा केला आहे. मुनमुन आणि राज यांच्या अफेअरची या आधीही चर्चा झाली होती. पण अभिनेत्रीनं हे नातं स्वीकारायला नकार दिला होता. आता या दोघांनी साखरपुडा केला असल्याचं बोललं जातंय. या महिन्याच्या सुरुवातीला आपापल्या कुटुंबियांच्या उपस्थितीतदोघांनी साखरपुडा केला आहे. बबिता जी म्हणजेच मुनमुन 36 वर्षांची असून टप्पू म्हणजेच राज अनाडकत 27वर्षांचा आहे. दोघांच्या वयातील फरकामुळं त्यांच्या नात्याची चर्चा होतेय.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘मुनमुन आणि राज यांनी वडोदरा गुजरात येथे साखरपुडा केला आहे. मुनमुन आणि राजच्या कुटुंबीयांनीही दोघांच्या नात्याला मान्यता दिली असल्याचं बोललं जातंय. या दोघांचे कुटुंबीय देखील या सोहळ्यात आनंदानं उपस्थित होते’ अशी माहितीही समोर आली आहे.

Rashtra Sanchar Digital:
whatsapp
line