बाई थोडा दम काढा हि शिवसेनेची शाळा!

मुंबई : (Deepali Sayyad On Navneet Rana) विधानपरिषदेच्या निवडणुकापासून राज्यात राजकीय नाट्य चालू आहे. बंडखोर एकनाथ शिंदे यांच्यामुळे सध्या महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले. शिंदे यांनी शिवसेनेचे ४० पेक्षा जास्त आमदार फोडून आसाममधील गुवाहाटी येथे घेऊन गेले आहेत.

दरम्यान, या पार्श्वभुमीवर महाराष्ट्रातील राजकारणाला दिवसेंदिवस वेगळे वळण मिळत आहे. त्यातच आता राज्याचे उच्चतंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हेसुद्धा शिंंदे गटाला मिळाले आहेत. नवनीत राणा या महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्यासारखी परिस्थिती आहे म्हणाल्या होत्या. त्यावर खासदार नवनीत राणा यांच्यावर दिपाली सय्यद यांनी टीका केली आहे. राणा बाई थोडी कळ काढा सुट्टीवर गेलेली पोरं परत येतील असं सय्यद यांनी म्हटलं आहे.

“राणा बाईला शिवसेना नावाचा रोग झाला आहे. राष्ट्रपती राजवट लावण्याची घाई झाली आहे. बाई थोडी कळ काढा हि शिवसेनेची शाळा आहे, सुट्टीवर गेलेली पोर परत येतील आल्यानंतर पहिले तुमचा अमरावतीतून सुफडा साफ करतील. बोगस कागदपत्रे…” असं ट्वीट दिपाली सय्य्द यांनी केलं आहे. यावर राणा यांच्याकडून या टिकेला काय उत्तर मिळणार हे देखील पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Prakash Harale: