’50 कोटी घ्या आणि शिंदे गटात या’: सेना आमदाराकडून मोठा गौप्यस्फोट

मुंबई : एकनाथ शिंदे आणि चाळीस पेक्षा जास्त शिवसेना आमदार मागील सहा दिवसांपासून बंड करत आहेत. ते सध्या गुवाहातीमध्ये आहेत. दिवसेंदिवस बंडखोर आमदारांची संख्या वाढतच चाललेली आहे. बंडखोर आमदारांची महाविकास आघाडीमध्ये गळचेपी होत होती त्यामुळं बंड करत असल्याचं शिंदे गटातील आमदारांकडून सांगण्यात येत होतं. मात्र महाविकास आघाडीतील आणि मुख्यतः शिवसेनेतील नेत्यांकडून ही सगळी विरोधी पक्षाकडून खेळी खेळली जात असल्याचं सांगण्यात येत आहे. अशातच एका शिवसेना आमदाराने देखील याबाबत गौप्यस्फोट केला आहे. शिंदे गटात येण्यासाठी त्यांना 50 कोटींची ऑफर आली होती अशी माहिती त्यांनी दिली आहे.

औरंगाबाद मधील कन्नडचे शिवसेना आमदार उदयसिंग राजपूत यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. त्यांना 50 कोटींची ऑफर आली मात्र 100 कोटी दिले तरी मी शिवसेनेसोबत गद्दारी करणार नाही असं वक्तव्य राजपूत यांनी केलं आहे. त्याबाबत अधिक माहिती सांगताना त्यांनी 50 कोटींपेक्षाही जास्त ऑफर होती. माझ्याकडे याबाबत दोन चारचाकी भरून पैसे आल्याचे फुटेज देखील असल्याचं सांगितलं आहे.

आमदार उदयसिंग राजपूत यांच्या 50 कोटींच्या दाव्यामुळे शिंदे गटाच्या बंडखोरी संदर्भात नवीन वळण आल्याचं दिसत आहे.

Dnyaneshwar: