तळेगाव नगरपरिषदेने काढला कचर्‍यातून उत्पन्नाचा मार्ग

तळेगाव : कचरा हा टाकाऊ असतो. टाकून दिलेला कचरा निरुपयोगी असतो, ही रूढ आता जुनी झाली असून कच-यातून कंपोस्ट खत तसेच उत्पन्नाचे विविध स्रोत निर्माण होतात. हीच संधी ओळखून तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने कच-यातून उत्पन्न निर्मितीचा मार्ग काढला आहे. यामुळे केवळ उत्पन्न मिळत नसून ओला आणि सुका कचर्‍याची मोठ्या प्रमाणात योग्य विल्हेवाट लागत असून प्रदूषण, दुर्गंधी, कच-याचे ढीग यापासून मुक्ती देखील मिळत आहे.तळेगाव दाभाडे नगरपरिषदेमार्फत शहरात दैनदिन निर्माण होणारा घरगुती कचरा नगरपरिषदेच्या एकूण २० घंटागाड्या मार्फत ओला, सुका व घातक कचरा अश्या पद्धतीने विलगीकरण करून संकलित केला जातो.

कचरा केवळ संचित न करता सुयोग्य नियोजन केल्यास त्यापासून उत्पन्न मिळते. त्यामुळे कचरा डेपोला आग लागल्याने व अन्य मार्गाने होणारे प्रदुषण नियंत्रण, रोजगार निर्मिती, पर्यावरण संवर्धन या बाबी देखील नियंत्रणात आणता येतात. हा विचार घेऊन सद्यस्थितीत तळेगाव दाभाडे नगरपरिषद काम करत आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत मोरखळा कचरा डेपोमध्ये विलगीकरण करून जमा होणार्‍या ओल्या व सुक्या कचर्‍यावर प्रक्रिया करणेचे काम अधिक सुनियोजित पद्धतीने सुरु करण्यात आले आहे.

सुका कच-यामध्ये काच, पुठ्ठा, प्लास्टिक, रबर, पत्रा, धातू अशा पद्धतीने प्रत्येक घटक वेगळे केले जातात. वेगळा करण्यात आलेले कचरा प्रक्रियेसाठी पाठवण्यात येतो. त्यापासून नगरपरिषदेस उत्पन्न प्राप्त होते.
सदर कंपोस्ट खताला MIDC येथील फ्लोरिकल्चर पार्क येथून चांगली मागणी आहे. यासोबतच नगरपरिषदेद्वारे लागवड केल्या जाणार्‍या वृक्षांना देखील हे खत वापरले जाते. या ठीकाणच्या नविन स्क्रीनिंग मशीनमुळे खत निर्मितीचा दर्जा आणि वेगही वाढला असल्याने कंपोस्ट खत निर्मितीला वेग आला आहे.

या वाढत्या खात निर्मितीचा फायदा नगर परिषदेस आर्थिक हातभार लागण्यास होणार असून संचालित केलेल्या कच-यास वेळोवेळी लागणारी आग त्यामुळे सभोवती होणारे प्रदूषण यास निश्चीतच आळा बसेल.

admin: