“डबलढोलकी पाटलांपासून मुख्यमंत्र्यांनी सावध राहावं”

मुंबई : एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांनी शिवसेनेसोबत बंड केल्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आलेला आहे. सध्या सुरु असलेल्या घटनांकडे पाहता महाविकास आघाडी सरकार धोक्यात आल्याचे चित्र आहे. अशातच शिवसेनेत दोन गट तयार झाले आहेत; बंड करणारा शिंदे गट आणि मुख्यमंत्र्यांसोबत असणारा एक गट.

दरम्यान शिंदे गटातील अनेक आमदारांना जबरदस्तीने नेण्यात आल्याची चर्चा सुरु आहे. उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील यांनी त्यांना शिंदे यांनी जबरदस्तीने गुजरातला नेले असल्याचे माध्यमांना सांगितले आहे. त्यावर ते खोटे बोलत असल्याचं शिंदे गटातील आमदार तानाजी सावंत यांनी सांगितलं आहे.

कैलास पाटील मिडियाची दिशाभूल करत आहेतअसं काहीही झालेलं नसल्याचं सावंत यांनी सांगितलं आहे. पाटील यांना गनपॉईंटवर नेण्याचा प्रकार घडलाच नाही. पाटील यांनी मिडियासमोर जे सांगितलं तस काहीही घडलं नाही. भाईंनी कुणालाही फोन केला नव्हता. कुणावरही दबाव टाकला नव्हता. प्रचंड पाऊसात चार किलोमीटर चालत गेल्याचा दावा संपूर्ण खोटा आहे. पाटील खोट बोलून पक्ष प्रमुखांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. असा खुलासा सावंत यांनी केला आहे.

कैलास पाटील हे डबल ढोलकी असणारे आमदार आहेत. यांच्यापासून पक्षप्रमुख यांनी देखील सावध राहावं असं सावंत यावेळी म्हणाले आहेत. कैलास पाटील स्वतःच जायचं म्हटले म्हणून आपण आलो होतो असंही सावंत यांनी यावेळी सांगितलं.

Dnyaneshwar: