“मला काही झालं तर नाना पाटेकर…”, अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या ‘त्या’ पोस्टने एकच खळबळ!

मुंबई | Tanushree Dutta’s Post In Discussion – अभिनेत्री तनुश्री दत्तानं 2018 मध्ये भारतात MeToo मोहीम सुरू केली होती. या दरम्यान, तिने प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. त्यामुळे ती चांगलीच चर्चेत आली होती. आता देखील तनुश्रीनं नाना पाटेकर यांच्यावर आणखी एक आरोप केला आहे. तिने यासंदर्भातली एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली असून तिच्या या पोस्टमुळे एकच खळबळ उडाली आहे.

तनुश्री दत्तानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं स्वतःचा एक फोटो शेअर करत लांबलचक कॅप्शन लिहिले आहे. ‘मला कधी काही झालं तर मी तुम्हाला सांगते की, नाना पाटेकर, त्यांचे वकील, सहकारी आणि त्यांचे बॉलिवूड माफिया मित्र जबाबदार आहेत! त्यांचे चित्रपट पाहू नका. त्यांच्यावर पूर्ण बहिष्कार टाका. माझ्या आणि PR बद्दल खोट्या बातम्या पसरवणार्‍या उद्योगातील सर्व चेहरे आणि पत्रकारांचा शोध घ्या. प्रत्येकाचे नीट निरीक्षण करा. त्याचे जीवन नरक बनवा कारण त्याने मला खूप त्रास दिला! कायदा आणि न्याय मला अपयशी ठरले असतील पण माझ्या या महान देशाच्या लोकांवर माझा विश्वास आहे, असं तनुश्रीनं म्हटलं आहे.

दरम्यान, तनुश्री दत्ताने 2018 मध्ये भारतात MeToo मोहीम सुरू केली होती. या दरम्यान, तिनं नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. तनुश्रीच्या म्हणण्यानुसार, 2009 मध्ये ‘हॉर्न ओके प्लीज’ चित्रपटाच्या गाण्याच्या शूटिंगदरम्यान नाना पाटेकर यांनी तिच्या खूप जवळ जाण्याचा प्रयत्न केला होता. नाना पाटेकर यांच्यावरील या आरोपामुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे.

Sumitra nalawade: