पुणे:
पुणे महानगर परिवहन म्हणजेच पीएमपीएलच्या ताफ्यात २०० सीएनजी बस येणार आहेत. संचालक मंडळाच्या बैठकीत टाटा कंपनीच्या बस खरेदीला मंजुरी देण्यात आली आहे.याबाबतची माहिती पुणे महापालिकेचे (PMC)अतिरीक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली आहे
अतिरीक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून सीएनजी बस खरेदी करण्याची प्रक्रिया सुरु होती. अखेर संचालकांच्या बैठकीत टाटा कंपनीच्या बस खरेदीला मंजुरी देण्यात आली आहे. कमी किंमतीत या बस मिळणार आहेत. टाटा कंपनीच्या या बसची किंमत ही ४७ लाख रुपये असणार आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत टाटा कंपनीच्या बस खरेदी करण्यासाठी अखेर मान्यता दिली आहे. आता या बस खरेदीसाठी पुणे महानगर पालिका ६० टक्के तर पिपंरी चिंचवड महानगर पालिका ४० टक्के अर्थपुरवठा करणार आहे.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, पीएमआरडीसह एमआयडीसी आणि जिल्हा परिषदेच्या हद्दीतही बससेवा पुरवण्यात येणार असल्याची माहिती संचालक मंडळाच्या बैठकीत देण्यात आली आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या हद्दीतही बससेवा पुरवण्यात येत आहे. दरम्यान, एमआयडीसी आणि जिल्हा परिषद यांच्या हद्दीतील सेवेबद्दल कंपनीला संबंधित संस्थांकडून कोणतीही आर्थिक मदत केली जात नाही. त्यामुळं बस खरेदीसाठी या संस्थांनी देखील आर्थिक मदत करावी, अशा मागणीचे पत्र व्यवस्थापनाच्या वतीनं पीएमईरडीए, जिल्हा परिषद, आणि एमआयडीसीला देण्यात येणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली आहे.
जुन्या बसेसचा काथ्याकुट…!
गेल्या काही वर्षांच्या कालावधीत पुणेकर प्रवाशांची ‘ लाईफलाईन’ समजली जात असलेल्या पीएमपीएलच्या बसेसच्या प्रवाशांचा टक्का चांगलाच वाढला आहे, त्यामुळे उत्पन्नातही चांगलीच भर पडत आहे. मात्र; हे वास्तव असतानाच प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्यात पीएमपीएमएलच्या प्रशासनाला सपशेल अपयश आले आहे. त्यामुळे प्रवाशांची चांगलीच वाताहत झाली आहे, विशेष म्हणजे उपलब्ध बस आणि प्रवाशांची वाढती संख्या यांचा ताळमेळ बसविण्यासाठी पधरा वर्षांपेक्षा जुन्या बसेस मार्गावर आणल्या जात असून त्यामुळे प्रवाशांना खिळखिळया झालेल्या बसमधून प्रवास करण्याची वेळ आली आहे.