ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी होणार टीम इंडियाची घोषणा; रोहित, विराट, बुमराहला विश्रांती?

Team India Squad For The Australia : एकदिवसीय वर्ल्डकपपूर्वी भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे. 22 सप्टेंबरपासून मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आज संघाची घोषणा करणार आहेत. या मालिकेत काही प्रमुख खेळाडूंना विश्रांती मिळू शकते, तर काही नवीन खेळाडूंना संधी मिळू शकते.

भारताला ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाविरुद्ध सामने खेळायचे आहेत. याशिवाय 28 सप्टेंबरपर्यंत वर्ल्डकप संघात बदल केले जाऊ शकतात, अशा परिस्थितीत टीम इंडियाला कोणताही प्रयोग करायचा असेल तर ही शेवटची संधी आहे. अशा परिस्थितीत जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या किंवा इतर काही खेळाडूंना विश्रांती मिळण्याची शक्यता आहे.

विराट कोहली आणि रोहित शर्मालाही विश्रांती देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे, मात्र ऑस्ट्रेलियासारख्या महत्त्वाच्या संघासमोर या दिग्गज खेळाडूंना विश्रांती घेणं हा निर्णय चूकचा ठरू शकतो, कारण ऑस्ट्रेलियानेही आपला मजबूत संघ इथे पाठवला आहे.

Prakash Harale: